जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातून रोज 1 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाला हरवून बरे होत आहेत. आज 1116 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज 1167 नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज 1116 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, आज 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत 1793 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात आतापर्यत 1 लाख 1 हजार 808 रुग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी 88 हजार 265 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सध्या 11 हजार 750 रुग्ण उपचार घेत आहे.
आजचे कोरोना रुग्ण जळगाव शहर 233, जळगाव तालुका 40, भुसावळ 120, अमळनेर 101, चोपडा 69, पाचोरा 40, भडगाव 36, धरणगाव 43, यावल 68, एरंडोल 132, जामनेर 118, रावेर 699, पारोळा 21, चाळीसगाव 13, मुक्ताईनगर 6, बोदवड 53, आणि इतर जिल्ह्यातील 13, असे 1167, रूग्ण आढळून आले आहेत.







