• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खोब्रामेंढा जंगलात चकमकीत पाच माओवादी ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2021
in महाराष्ट्र
0

गडचिरोली (वृत्तसंस्था) – गडचिरोली येथील पोलीस उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवार, २९ रोजी सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी याला दुजोरा दिला. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ३ पुरूष व २ महिला नक्षलवादी असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. शनिवार २८ मार्चपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहे. आतापर्यत दोन चकमकी झाल्या आहे. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. तेव्हा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शनिवार २८ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनीटे चाललेल्या चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले.

चकमकीनंतर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. घटनास्थळी एक ३०३ रायफल मॅग्झीन काडतुसासह, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब, तसेच मोठ्या प्रमाणात औषधी साठा व नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मिळून आलेल्या ३ नग प्रेशर कुकर बॉम्ब हे बिडीडीएस पथकाच्या साहायाने घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. सी-६० कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतूक केले आहे.


 

 

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल

Next Post

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात : संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon