जामनेर (प्रतिनिधी) – ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 177 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठया उत्साहात आज दि. १० मार्च रोजी साजरा करण्यात आली. या प्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ महेंद्रसिंग चौहान व प्रशासकीय अधिकारी श्री रामदास आरक, डॉ राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेच पूजन करून आपले मनोगत व्यक्त केले.वरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समृद्धी विसपुते यांनी केले. प्रस्ताविक व मान्यवरांचा परिचय BVG साईड मॅनेजर श्री संतोष भिसे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री जितू कुमावत यांनी केले व कार्यक्रमाची सर्व व्यवस्था सुदर्शन वराडे व मयुर झाल्टे यांनी केली तसेच जगदीश बैरागी, विश्वनाथ चव्हाण, नरेंद्र चव्हाण, योगेश पाटील, विशाल पालवे, अविनाश भोई, राज ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.









