नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीत आतापर्यंत एकूण 384 कोरोनो व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 91 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 259 रुग्ण मकरजचे आहेत. केजरीवाल म्हणाले की या 384 प्रकरणांपैकी 58 रुग्ण परदेशात गेले होते. त्यातील बरेच लोक दिल्लीचे नाहीत, परंतु त्यांना येथे दिल्लीत आयसोलेट करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवारी) दिली. दिल्लीत कोरोना विषाणूमुळे एकूण 5 मृत्यू झाले आहेत, कालपर्यंत ही संख्या 4 होती. गेल्या 24 तासांत आणखी एक मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की 57,000 लोकांना सामावून घेण्यासाठी आम्ही 328 मदत केंद्रे तयार केली आहेत. कोणीही या मदत केंद्रांवर येऊन येथे राहू शकते. आम्ही त्यांची काळजी घेऊ, असेही केजरीवाल म्हणाले.