एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल शहराजवळील हॉटेल फाउंटननजीक झालेल्या अपघातात चंदनवाडी येथील शिक्षिका व एरंडोल येथील रहिवासी असलेल्या कविता कृष्णकांत चौधरी (35) व लावण्य कृष्णकांत चौधरी (12) या माय – लेकांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. मुलगा लावण्य यांना घेवून दुचाकीने कविता चौधरी या शहराकडे येत असताना वळणावर ट्रकच्या चाकाखाली आल्याने माय – लेकांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, अकील मुजावर, संदीप सातपुते, मिलिंद कुमावत, पंकज आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे एरंडोल शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.