जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली रोडवरील जैन कंपनीच्या कॉर्नर येथे पैसे घेण्याच्या कारणावरून रियाज खाटीक, रा. शिरसोली याने लोखंडी पाईपाने मटन विक्रेता बाबु खाटीक रा. मेहरूण बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बाबु कासम खाटीक (वय-४६), रा. राम नगर, मेहरूण हा मटन विक्रेता आहे. मटनचा व्यवसाय असल्यामुळे तालुक्यातील शिरसोली येथील रियाज इलियाज खाटीक याच्याकडून कोंबडी घेत असतो. दरम्यान, २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रियाज खाटीक हा कोंबडीचे पैसे घ्यायला बाबु खाटीकच्या घरी गेला होता. पैस मिळाले नाही म्हणून दुपारी बाबु खाटीकच्या दुकानावर रियाज आला असता. कोंबडीचे पैसे घेण्यासाठी घरी का गेला असा विचारल्याचा राग आल्याने रियाजने लोखंडी पाईप घेवून बाबु खाटीकच्या डोक्यात मारहाण केली. यात बाबु खाटीक गंभीर जखमी झाला. जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रियाज खाटीक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.







