जळगाव: येथील वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी जून २०२० पासून आजतागायत ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध विषयावरील स्पर्धेमध्ये तसेच कोविड-१९ काळात जनजागृतीसाठी आयोजित राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नमंजुषा सहभागी होऊन सुमारे दीडशे प्रमाणपत्र मिळवले आहे .केवळ सात -आठ महिन्यात हे यश संपादन केले आहे.
कोरोना काळात विद्यापीठ स्तरावर व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी म्हणून विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात प्रश्नमंजुषा, ऑनलाइन वेबिनार असे अनेक स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहेत तसेच माय जिओ च्या सरकारी वेबसाईट वरून ५० पर्यंत प्रमाणपत्र मिळवले असून महाविद्यालय इतर स्वयंसेवी संस्थांकडून विविध प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.