मुंबई,;- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामादिला असून राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
माजी वनमंत्री संजय राठोड आपला पदाचा राजीनामा देण्यासाठी पत्र घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्य वर्षा निवास्थानी दाखल झाले होते.
दरम्यान, शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला होता . संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले होते .







