जळगाव ( प्रतिनिधी ) ;– सिन्नर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी सध्या व्यंकटेश नगर जळगाव येथील प्राध्यापक संजय मोरे सर्व शक्ती सेना सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष नीरज जी शेट्टी यांनी नियुक्ती केली आहे.
या प्रसंगी भारतीय दलित साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष वनपाल सुमना , राष्ट्रीय महासचिव जय सोमनाथ आदी उपस्थित होते.
सर्व शक्ती सेना संघटन असून मुख्य उद्देश हा की कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून संघटनेचा मुख्य उद्देश भारत मातेचे संरक्षण व हिंदुत्ववादी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत काम करणे आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे भारतातील सर्वांना न्याय अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली . राष्ट्रीय अध्यक्ष नीरज शेट्टी यांचे स्वप्न आणि इच्छा आहे की संपूर्ण भारत देशात भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे तोच संकल्प मी आज रोजी करतो कि महाराष्ट्र मुक्त महाराष्ट्र करण्याचा मी प्रयत्न करीन महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना शासकीय केंद्रीय योजनांचा लाभ मिळवून देईल असे आश्वासन संजय मोरे यांनी यावेळी दिले .
महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये दौरे करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व शक्ती सेना यांचे संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करणार आहे त्याची सुरुवात माझे गाव सिंगनूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथून प्रथम सुरुवात करणार आहे.असेही ते म्हणाले .








