पहूर {प्रतिनिधी} – जामनेर तालुक्यातील पहूर येथील संतोषीमाता येथील रहिवासी के ही 132 महावितरण कर्मचारी योगेश गायकवाड यांचे धर्मपत्नी अर्चना गायकवाड वय 30 या विवाहित महिलेने आज सकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही त्याच्यात पश्चात एक मुलगा एक मुलगी पती असा परिवार आहे. काल दुपारी शोकाकुल वातावरणात पहूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खर्चाने येथील प्रगतिशील शेतकरी सुपडु पाटील यांची कन्या होती.









