भुसावळ : – शहरातील दत्त नगर, वांजोळा रोड येथील २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १७ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. या बाबत माहिती अशी की, शहरातील वांजोळा रोड येथील दत्त नगर भागातील रहिवासी पियुष उर्फ बॉबी छगन देवरे ( वय २०) याने दि. १७ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात वरच्या मजल्यावर पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. दरम्यान आई, बहीण ह्या खालच्या घरात असतांना वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी जातो असे सांगून तो वरच्या मजल्यावर गेला, बराच वेळ तो खाली न आल्याने बहीण जेवणासाठी बोलाविण्यासाठी गेली असता पियुष गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात विनोद देवरे यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








