अमळनेर : तालुक्यातील धार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेची स्थापना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर पाहणीसाठी आले असतांना ते अमळनेर शहराकडे परत जातांना त्याच्या हस्ते तालुक्यातील धार येथील शाखा फलक अनावरण करण्यात आले. यावेळी आ.अनिल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, गोविंदा बाविस्कर, निनाद सिसोदे, तसेच गावातील नागरिक गणेश पाटील,हिंमत पाटील, संजय पाटील, अलीमभाई मुजावर, माजित मुजावर, भैय्या पाटील अक्षय पाटील आदी उपस्थित होते.