भुसावळ : नाथाभाऊंवर गेल्या पाच वर्षांपासून अन्याय होता आहे हे आपण सुरुवातीपासून म्हणत आलो आहे. स्वाभिमानी असलेल्या या नेत्याने आता राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे.भुसावळ शहरातला प्रश्न गंभीर असून या प्रश्नांना नाथाभाऊ व संतोष चौधरी यांनी मिळून गती देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करा अश्या सूचना प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी दिल्या.तसेच खान्देशात आपण बेरजेचे राजकारण सुरु केले असल्याचे ते म्हणाले.
भुसावळात तेली समाज मंगला कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते बोलता होते. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना. पाटील पुढे म्हणाले की,शिवसेना व काँग्रेस हे देखील महाविकास आघाडी सराकाचे घटक असल्याने त्यांनाही सोबत घेत महाविकास आघाडीच्या भावनांना छेद पडणारा नाही असे काम करा असेही ते म्हणाले.
माजी आ.चौधरी म्हणाले की,गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा एबी फॉर्म गायब झाल्याने भुसावळ विधानसभेची जागा हातची गेली. मात्र आता नाथाभाऊ आणि आम्ही एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुका एकत्रच लढून जिल्ह्यात पाच ते सहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आ. संतोष चौधरी,माजी आ. मनीष जैन, आ.अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, माजी आ. डॉ. गुरुमुख जगवाणी, युवक प्रदेेशाध्यक्ष मेहबुब खान, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, महानगर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.







