नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया 2020 या ब्युटी कॉन्टेस्टचा बुधवारी रात्री म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत फिनाले पार पडला. यावेळी मिस इंडिया 2020 या स्पर्धेची विजेता मानसा वाराणसी ठरली आहे.
तर हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया 2020 ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया 2020 ची रनरअप ठरली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यंदाचा मिस इंडिया 2020 हा सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला असून, यंदाच्या मिस इंडियाचे हे 57 वे पर्व होते.
या दिमाखदार सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांचा समावेश होता. तर अपारशक्तिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते.







