जळगाव,;- सुरक्षा रक्षक मंडळ हे सुरक्षा रक्षकांचे हित डावलून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशन सुरक्षा रक्षक कामगार समितीतर्फे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभिले आहे.
सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा यासाठी अनेकवेळा निवेदने आणि उपोषणे करण्यात आली होती . २८ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चार दिवसानंतर आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र महिना उलटल्यावरही मागण्या मान्य न झाल्याने समितीतर्फे आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
यांचा होता उपोषणात सहभाग
उपोषणात संघटनेचे अध्यक्ष कॉ. राजेश गायकवाड, सचिव बापूसाहेब जावळे, संघटक एकनाथ झाडे, मनोज धिवरे, विश्वास वानखेडे, अनिल तायडे, मोतीलाल ढाके, सचिन नन्नावरे, वासुदेव बडगुजर, दिनेश खंबायत, राजेंद्र साळुंखे, गोरख पाटील आदी सहभागी झाले आहेत.







