जळगाव ;- बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी सुमारे १८ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवार ७ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएमआयटी कॉलेज परिसरमध्ये राहणाऱ्या बेबीबाई अविनाश पाटील (वय ४०, रा.) यांच्या घरी चोरी झाली . बेबीबाई ७ रोजी सर्व कुटुंबीय मालमत्तेच्या कामासाठी धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे गेले होते. याच रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्याचे कानातले टॉप, रिंग, पेंडल, सोन्याची नथ असा १८ हजार ४०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार शेजार्याना माहित पडल्याने त्यांनी याबाबत बेबीबाई यांना माहिती दिली होती . शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.