जळगाव ;- २५ हज़ार रुपये किमतीचा मोबाईल चोरणाऱ्यास दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,
लक्ष्मीनगरातील गिरणार अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास असलेले मनोज सिताराम मवर्मा(वय-४३, रा. लक्ष्मीनगर) कार (एमपी०४ सीएफ ८१२३) ने घराकडे येत असातांना रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी गाडी आडवली लावून त्यांची कार थांबवली. खाली उतरल्यावर मनोज वर्मा यांच्या नाकावर तोंडावर बुक्के मारुन शिवीगाळ करत, वर्मा यांच्या खिश्यातील २५ हजार रुपये किंमतीचा ॲड्राईड मोबाईल चोरुन नेला होता. दाखल गुन्ह्यात राहुल सुभाष सपकाळे (वय-२४,रा.मेस्कोमात नगर)याला ३० ऑक्टोबर रोजीच अटक झाली होती. तर, त्याचा साथीदार भुषण डिंगबर सपकाळे (वय-३४) हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल, गोविंदा पाटिल, सचिन पाटील यांच्या पथकाने संशयीताचा शोध घेत अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर संशयीताची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.








