• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे – छगन भुजबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2021
in महाराष्ट्र
0

नाशिक (वृत्तसंस्था) – चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला प्रशासकीय संकुल येथे येवला तालुका पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्हा शेती व्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारी वर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. अद्यापही प्रशासकीय संकुलात अजून विविध विकासकामे करायची आहेत. देशाला मॉडेल ठरेल अशी ही वास्तू निर्माण केली. त्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. येवला प्रशासकीय संकुल हे देशातील शासकीय वास्तूंमधील रोल मॉडेल आहे. त्यामुळे ही वास्तू चांगली ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

येवला तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची 30 कोटी 92 लाख रुपयांची कामे आणि विंचूर लासलगाव सुमारे 17 कोटी असे एकूण 48 कोटी 42 लाख रुपयांची कामे निविदा स्तरावर आहेत. तसेच नाशिक येवला रस्ता यासह विविध कामे निविदा स्तरावर असल्याचे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणूक विजयी आणि पराभूत झालेल्या सर्वांनी एकत्र येऊन गावांचा विकास साधावा. या संकुलात आजपर्यंत उपविभागीय अधिकारी(प्रांत) कार्यालय, तालुकास्तरीय प्रशासकिय इमारत (तहसिल कार्यालय), पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद इमारत, फलोत्पादन अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय सा.बां.विभाग कार्यालय, दुकान निरीक्षक कार्यालय, रेशीम उद्योग कार्यालय, बहुउद्देशिय हॉल इ. इमारती पूर्ण होऊन कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यात पोलीस स्टेशनचा समावेश झाला असून राहिलेली कामे लवकरच पूर्ण केले जातील, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

येवला शहरात विखुरलेल्या स्वरुपात अडगळीच्या ठिकाणी व अपूऱ्या जागेत तालुका पोलीस स्टेशन कार्यान्वित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी या प्रशाकीय संकुलात तालुका पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 1 कोटी 33 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. या इमारतीचे सर्वसाधारण चटई क्षेत्रफळ -4250 चौ. फुट इतके आहे. यामध्ये मुख्य पोलिस स्टेशन इमारतीमध्ये तपासणी अधिकारी कक्ष, महिला कॉन्स्टेबल कक्ष, एस.एच.ओ.कक्ष, सशस्त्र खोली, पुरुष व महिला लॉकअप, प्रसाधन गृह, तपासणी कक्ष, संगणक कक्ष , रेकॉर्ड रुम, दिव्यांगासाठीचा रॅम्प तसेच इतर सोयीसुविधा असणार आहेत.


 

 

Previous Post

जम्मू-काश्मिरात भूकंपाचे धक्के

Next Post

सेलिब्रेटींच्या ‘त्या’ ट्विटची गुप्तचर विभागाकडून चौकशी होणार – सचिन सावंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सेलिब्रेटींच्या 'त्या' ट्विटची गुप्तचर विभागाकडून चौकशी होणार - सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon