जळगाव ;- येथील विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे पीएच. डी मार्गदर्शक डॉ अविनाश बडगुजर, यांचे वाड्मय चौर्य बाबत चौकशीची मागणी करण्यात आली होती . या बाबत आपण अजूनही काहीही चौकशी केलीली नाही किंवा मला कळविले नाही.अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे महानगर सचिव अँड कुणाल पवार यांनी प्र कुलगुरू पीपी पाटील यांच्याकडे केली आहे . यात म्हटले आहे कि
पीएच डी संशोधक विद्यार्थ्यांना डॉ अविनाश बडगुजर मार्गदर्शन करीत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांची संशोधन प्रक्रिया त्वरित थांबविण्यासाठी कळविले असून कार्यवाही व्हाव्ही अशी मागणी केली आहे. मात्र काही चुकीचे घडल्यास आपण व प्र कुलगुरू व्यक्तिशः जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी असावा इशारा अँड कुणाल पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .








