तहसील महसूल विभागाकडून १५ टॉवर होणार सील
जळगाव ;- जळगाव शहरात असणाऱ्या एकूण १५ टॉवरवर थकबाकी असणाऱ्या एटीसी टेलीकॉमच्या मोबाईल टॉवरवर सीलची कारवाई तहसील कार्यालयामार्फत करण्यात येत असून सुमारे प्रति टॉवर एक वर्षांची एकूण ३६ हजार ५०० रुपयांची थकबाकी असल्याने हि कारवाई करण्यात येत आहे . यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शहरात एकूण एटीसी टेलीकॉमचे १५ मोबाईल टॉवर असून त्यांच्यावर दिवसभरात कारवाई होणार आहे .

हि कारवाई जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशाने
जळगाव शहर मंडळ अधिकारी योगेश नन्नावरे , मेहरूण तलाठी राजू बाऱ्हे,जळगाव शहर तलाठी रमेश वंजारी, यांच्या पथकाने जळगाव शहर
मधील महसूल थकबाकी असलेल्या मोबाईल टॉवर सिल करण्याची धडक कारवाई सुरु केली आहे .
सदर मोबाईल टॉवरचे एटीसी टेलीकॉम कंपनी यांना महसूल थकबाकी भरणेकामी नोटीस देण्यात आलेल्या होत्या . त्यांनी शासकीय भरणा न केल्याने महसूल विभाग मार्फत सदरील कारवाई करण्यात आली आहे.







