एरंडोल ( प्रतिनिधी ) ;- महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा बीलं पाठवून सर्वसामान्य वीजग्राहकांची फसवणूक केली. ऊर्जामंत्री थकीत वीज माफीची घोषणा करतात आणि नंतर शब्द फिरवतात. राज्य शासनाच्या या जुलमी निर्णयाविरुध्द भारतीय जनता पक्ष आता रस्त्यावर उतरून हा निर्णय मागे घ्यावा म्हणून आंदोलन करणार आहे. महावितरणाने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावून, 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या,शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या महावितरणाविरोधात एरंडोल भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. निषेध मोर्चा काढत ,महावितरणकेंद्र/महावितरण कार्यालय, मसावद रोड येथे “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन” करण्यात येणार आहे.
या निषेध आंदोलनात सर्व आजी माजी शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष,,नगरसेवक,जि.प.पं.स.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी,मंडल पदाधिकारी, आघाडी/मोर्चे पदाधिकारी,गट व गण प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, अमोल जाधव ,राजेंद्र पाटील तालुका सरचिटणीस निलेश परदेशी शहराध्यक्ष,तालुका युवा मोर्चाअध्यक्ष प्रशांत महाजन,शहराध्यक्ष आबा चौधरी यांनी केले आहे.कार्यक्रमास उपस्थित तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील
रमेश परदेशी नगराध्यक्ष अशोक चौधरी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष , अमोल जाधव तालुका सरचिटणीस, सचिन पानपाटील लोकसभा विस्तारक,सुभाष पाटील,निलेश परदेशी शहराध्यक्ष ,प्रशांत महाजन ,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आबा चौधरी शहराध्यक्ष युवा मोर्चा जोहर सेट कासम नगरसेवक ,संजय साळी वाल्मीक सोनवणे एडवोकेट नितीन महाजन नगरसेवक, अकील शेख उपाध्यक्ष, लोकेश महाले ,धनराज मिस्त्री, भूषण बडगुजर,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष निखिल सूर्यवंशी, तालुका सरचिटणीस कल्पेश पाटील , तालुका सोशल मीडिया प्रमुख शुभम पाटील, शहर उपाध्यक्ष रोहित पाटील, सरचिटणीस विश्वास पाटील शहर उपाध्यक्ष आकाश ठाकूर शहर उपाध्यक्ष रविराज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होतेतालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते







