मुंबई ;- पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात येत्या 17 फेब्रुवारीपर्य़ंत ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात कठोर कारवाई करु नये, असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
त्यामुळे एकनाथ खडसे यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीकडून एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेमुळे भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले खडसे यांनी उच्च न्यायलयात याचिका केली आहे.
याचिकेवर न्यायलयात सुनावणी झाली. भोसरी एमआयडीसीमधील तीन एकराचा भूखंड खडसे यांनी काही वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र मंदीपदाचा गैरवापर करुन हा भूखंड घेतला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुमारे 31 कोटी रुपयांचा हा भूखंड खडसे यांनी 3.75 कोटी रुपयांना घेतला होता. याबाबत काही सामाजिक कार्यक्रर्त्यांनी उच्च न्यायलयात याचिका केली होती. ईडीने राजकीय आकसापोटी तपास सुरु केला आहे. त्यामुळे ही फिर्याद रद्द करावी, अशी मागणी खडसे यांनी याचिकेत केली आहे.







