रावेर ;- काल बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाजवळ एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्यावरून रावेर पोलिसांनी तपासचक्रे वेगात फिरवून अवघ्या २४ तासात खून करणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन खुनाचा उलगडा केल्याची घटना समोर आली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहीतीअशी कि , काल ३ फेब्रुवारी रोजी बहाणपूर -अंकलेश्वर महामार्गाला लागून एका प्लॉटिंग टाकलेल्या ठिकाणी रावेर शहरानजिक एका ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्युदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. कालच घटनास्थळी पोलिस निरिक्षक एस. टी. पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव यांनी चौकशी सुरू केली होती. दरम्यान, रावेर पोलिसांनी चोवीस तासातच या खूनाचा उलगडा केला आहे. याप्रकरणी चार आरोपीची ओळख पटली असून चारही जणांना अटक करण्यात आली आहे. महेश विश्वनाथ महाजन, विकास गोपाल महाजन, विनोद विठ्ठल सातव, भैय्या दुबी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. रावेर अशी या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.







