जळगाव ( प्रतिनिधी ) ;- गेल्या 2019 – 20 या वर्षीची केळी पिक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी खंबीर पाठपुरावा केला होता. तर गेल्या सप्ताहात वादळ व गारपीटीने झालेले नुकसानीची भरपाई तात्काळ मिळाली नाही तर शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने आज वादळ व गारपीट अंतर्गत पिक विमा हप्ता भरणारे 20 हजार शेतकऱ्यांना अंदाजित 80 कोटी रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मिळायला सुरुवात झाली असून आज नांद्रा, पिलखेडा, नंदगाव, फेसर्डी, फुफणी, किनोद, कठोरा, करंज, सावखेडा, भोकर, भादली, गाढोदा या परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे फोन करून तसेच सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे.खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून सन 2019 – 20 या वर्षीची केळी पिक विमा अंतर्गत (कमाल व किमान तापमानाची) सुमारे 42500 शेतकऱ्यांना 53 हजार हेक्टर क्षेत्रावरील सुमारे 275 कोटी रूपयांची नुकसान भरपाई लाभ यापूर्वी मिळालेले असून वादळ व गारपीट अंतर्गत पिक विमा हप्ता भरणारे 20 हजार शेतकऱ्यांना मिळणार 80 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार असल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांचेवर केळी पीक नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांकडून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
केळी पिक विमा योजना सन 2019 – 20 अंतर्गत दि.१७ मार्च २०२० रोजी झालेल्या वादळ गारपीटची नुकसान भरपाई रक्कम जमा न झाल्याने एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे राज्य प्रतिनिधी अतुल झानकर यांना दूरध्वनीद्वारे गेल्या पंधरवाड्यात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जाब विचारला होता.पुढील आठ दिवसात विलंब शुल्कासह रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांसह संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. तसेच शेतकऱ्यासमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा कृषी सचिवांना देखील आपल्या पत्रात दिला होता.. या भक्कम पाठपुरावामुळे शेतकऱ्याना गेल्या दोन दिवसांपासून भरपाई रककम मिळण्यास सुरुवात झाली असून केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खासदारांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.







