जळगाव ( प्रतिनिधी ) ;- श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, बांभोरी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका श्रीमती अंकिता कांबळे यांना एम. फार्मसी च्या “अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ लिनेझोलीड नॅनोबायोकंपोझिट फॉर सस्टेन्ड रिलीझ ” या प्रबंधास भारत सरकार पेटंट कार्यालय यांच्याकडून स्वामित्व अधिकार प्राप्त झाले असून त्याबद्दल संस्थेचे विश्वस्थ आदरणीयरावसाहेब शेखावत, डायरेक्टर डॉ. के. एस. वाणी, डॉ. एस. पी. शेखावत, प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी अभिनंदन केले.
श्रीमती अंकिता कांबळे यांनी डॉ. एस. जे. वधेर प्राध्यापक स्कूल ऑफ फार्मसी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फार्मसी चा प्रबंध पूर्ण केला असुन स्वामित्वहक्क दोघांच्या नावे आहे.
संस्था व महाविद्यालय नेहमीच संशोधन प्रेरक असे वातावरण निर्माण करून देते व शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन प्रति जोपासण्यासाठी प्रोत्साहन देत असते. महाविद्यालयातील प्रयोगशाळेमध्ये अद्यावत उपकरणाने उपलब्ध असून ग्रंथालयामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व पुस्तके उपलब्ध आहेत जेणेकरून शिक्षक व विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळेल.
श्रीमती अंकिता कांबळे यांच्या यशाबद्दल संस्थेतील सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले असून व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







