नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदी अरेबियाने भारतासह 20 देशातील हवाई वाहतूक स्थगित केली आहे. या बंदीनंतर सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे नातेवाईक, डॉक्टर व फक्त सौदी अरेबियाचे नागरिकच सौदी अरेबियामध्ये प्रवेश करू शकतील. 3 फेब्रुवारीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

सौदी अरेबियाने देशातील करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन हवाई वाहतूक स्थगितीचा आदेश जारी केला आहे. संयुक्त अरब अमीरात, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, इजिप्त आणि पाकिस्तान या देशातील लोकांना बंदी घालण्यात आली आहे.
करोनाचा नवीन विषाणू सौदी अरेबियामध्ये आढळून आल्यानंतर सौदी अरेबियाने परदेशी प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.21 डिसेंबर 2020 रोजी सौदी अरेबियाने परदेशात जाणारे आणि परदेशातून येणाऱ्या विमानांचे उड्डाण थांबले होते. त्यानंतर 28 डिसेंबर रोजी ही स्थगिती परत वाढविण्यात आली.
करोनाचे नवीन विषाणू सापडल्यानंतर निर्णय घेतला होता. यानंतर चार जानेवारीला ही स्थगिती उठवण्यात आली. आता पुन्हा वीस देशांमधील लोकांसाठी ही स्थगिती घालण्यात आली आहे. सौदीमध्ये करोना विषाणूचे तीन लाख 68 हजार 639 इतके प्रकरण नोंदवले गेले आहेत.







