नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चौरी-चौरा शताब्दी महोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या एकतेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एका टपाल तिकीटाचे उद्घाटन करण्यात आले.

मोदी म्हणाले, ‘देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा. याच भावनेने आपल्याला देशातील प्रत्येक व्यक्तीसोबत पुढे जायचे आहे’
‘करोनाच्या काळात देशाच्यासमोर जी आव्हाने होती, त्यावर तोडग्यासाठी यंदाचं बजेट नवा वेग देईल. अनेक दशकांपासून आपल्या देशात कोणाच्या नावाने काय घोषणा केली इतकाच बजेटचा अर्थ राहिला होता. बजेटला वोट बँकेच्या हिशोबाची वही बनवून ठेवलं होतं,’ अशा शब्दांत मोदींनी बजेटवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केलं.
शेतकऱ्यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ‘जर आपला शेतकरी अधिक सशक्त झाला तर कृषी क्षेत्रात होत असलेली प्रगती आणखी वेग घेईल, यासाठी बजेटमध्ये अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. बाजार शेतकऱ्यांच्या फायद्याचा व्हावा यासाठी १००० आणखी बाजारांना ई-नामशी जोडण्यात येणार आहे’







