मुंबई (वृत्तसंस्था) – दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांच्याबाबत भाजपचे उत्तर प्रदेशातील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य नंदकिशोर गुर्जर यांनी केलं आहे. माध्यमांंशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लासुद्धा भाजपच्या नंद किशोर गुर्जर यांनी दिला आहे.
दरम्यान, आपण स्वत:ही शेतकरी असल्याचं नंदकिशोर त्यांनी म्हटलं आहे.







