मुंबई ;- – केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. शिवसेनेने या आंदोलनाला वेळोवेळी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुख-दुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत आज दुपारी एक वाजता दिल्लीच्या सीमेवरील गाझीपुर परिसरात आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.







