मुंबई (वृत्तसंस्था) – मिर्झापूर, तांडवर यांसारख्या वेब सिरिजविषयी आलेल्या तक्रारीनंतर सरकारने गंभीर पावले उचलली आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित आल्यानंतर आता त्यांच्यासाठी लवकरच नियमावली ठरविण्यात येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट व वेब सिरीज, डिजिटल न्यूज पेपर्स प्रेस काwन्सिल कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्प कायदा वा सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत येत नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कामासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.








