• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या तारखेनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल ; बीजेपी आमादाराच्या वक्तव्याने खळबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2021
in भारत
0

बंगळूर (वृत्तसंस्था) – विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. कर्नाटकात काँग्रेस-निजदचे सरकार पाडून भाजपने सत्ता हिसकावली असली तरी भाजपात सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळविस्तारावरून मुख्यमंत्री येडीयुराप्पांना आमदारांची प्रचंड नाराजी झेलावी लागत आहे. आता एका आमदाराने थेट मुख्यमंत्री बदलाची तारीख जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या आमदाराने 13 एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि निजदने एकत्र येऊन सरकार स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र दीड वर्षानंतर आमदारांना आपल्या गोटात घेऊन भाजपने काँग्रेस-निजदकडून सत्ता हिसकावून घेतली. आता पुन्हा एकदा कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप आमदारांनी बंड पुकारले आहे. यामुळे येडीयुराप्पा यांची खुर्ची धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागिल महिन्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर येडीयुरप्पांनी त्या आमदारांना हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली त्यांची नावे दिल्लीत ठरवण्यात आल्याचे सांगून एक मंत्रीपद रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, यानंतर भाजपच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरुन गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण तापले असून येडीयुराप्पांची डोकेदुखी वाढली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपचे आमदार बीपी यतनाल यांनी गंभीर आरोप केले. कर्नाटकातील आमदार मागील तीन महिन्यापासून सीडीवरुन मुख्यमंत्री येडीयुरप्पांना ब्लॅकमेल करत आहेत. यापैकी एकाला राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्री बनविण्यात आले आहे, असे बीपी यतनाल यांनी सांगितले. यामुळे ती सीडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

भाजप आमदार बसनगौडा पाटील यतनाल म्हणाले, कर्नाटकमध्ये उगडी सणापासून नवीन वर्ष साजरे केले जाते. हे वर्ष यंदा 13 एप्रिलपासून सुरु होत आहे. या दिवसाला कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य पाटील यांनी केले. ते विजयपुरमध्ये बोलत होते. मला हात पसरुन मंत्रीपद मागायची गरज नाही. कारण आपला माणूस मुख्यमंत्री होणार आहे. तोच मला मंत्रीपद देणार आहे. हा नेता उत्तर कर्नाटकातील असेल, वाट पहा आणि बघा असे ते म्हणाले.


 

 

Previous Post

मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद

Next Post

चाकणमध्ये भर चौकात वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाकणमध्ये भर चौकात वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon