पाचोरा.. (प्रतिनिधी) ;- सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्यांची सरल प्रणालीत ऑनलाइन नोंदणी करून तालुक्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत व कामकाज पूर्ण करावे अशा सूचना गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिल्या. दिनांक 28 व 29 जानेवारी रोजी तालुक्यात पार पडलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाचोरा तालुक्याचे आधार कार्ड चे कामकाज 87 टक्के झाले असून उर्वरित 13 टक्के कामकाज येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचे आवाहन सर्व उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांनी केले. 103 तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तालुक्यातील 27 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे स्वाध्याय सोडवून घेणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे त्यांनी अभिनंदन देखील केले. जास्तीत जास्त स्वाध्याय सोडवणारा तालुका म्हणून पाचोरा तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर असून हे सारे श्रेय तंत्रस्नेही शिक्षकांचे असल्याचे श्री पाटील यांनी आवर्जून सांगितले. सरल प्रणाली, शालेय पोषण आहार, गणवेश योजना ,सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण करणे ,आवश्यक तेथे वर्गखोल्यांची मागणी करणे, जीर्ण झालेल्या खोल्यांचे निर्लेखन करणे ,शौचालय व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून घेणे ,जीर्ण व पडक्या झालेल्या खोल्यांचा प्रस्ताव सादर करणे अशा विविध बाबींचा आढावा सदर शिक्षण परिषदांमधून केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी व गटशिक्षणाधिकारी श्री पाटील यांनी घेतला. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती चे 85 लाख 44 हजार 500 रुपये तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून तालुक्यातील 6123 विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार असून संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्या. इयत्ता पहिली ते चौथी साठी एक हजार रुपये ,पाचवी ते सातवी साठी 1500 रुपये व आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना प्रति दोन हजार रुपयाची शिष्यवृत्ती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर येत्या आठ दिवसात जमा करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.
ज्या शाळांमध्ये विज बिल थकीत आहे थकीत आहे अशा शाळांनी ग्रामपंचायतीशी संपर्क करून सदर वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम भरण्याची कार्यवाही करावी नियमित वीज देयके शाळेला दिलेल्या अनुदानातून भरावीत. शाळेमध्ये विद्युत पुरवठा अद्यावत करून घ्यावा अद्यावत करून घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या.
सदर शिक्षण परिषदेला त्या-त्या केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी उपस्थित होते.
शा.पो.आ.अधिक्षिका श्रीमती.सरोज गायकवाड यांनी शा.पो.आ.विषयी मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख श्री.दिलीप शिरसाठ यांनी केंद्राचा आढावा घेतला. श्री.वासुदेव पाटील सरांनी PGI बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. श्री.सुनिल पाटील सरांनी PSLM, NISHTHA बाबत मार्गदर्शन केले.वैशाली पाटील मॅडम यांनी समावेशित शिक्षण सक्षमीकरण बाबत मार्गदर्शन केले.श्री.दिलीप सोनवणे सरांनी जत्रा व खेळणी या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रमेश महाजन सर होते.सुत्रसंचलन श्री.विजय ठाकूर सर व आभारप्रदर्शन श्री.सारंग नन्नवरे यांनी केले.परिषदेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.








