मुंबई ;- कोरोनाने सरकारी जावई समजल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. पहिल्यांदाच मार्च महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० ते ७५ टक्के वेतन कपात केली जाणार आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
मुंबई : कोरोनाने सरकारी जावई समजल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. पहिल्यांदाच मार्च महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० ते ७५ टक्के वेतन कपात केली जाणार आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
क वर्ग श्रेणीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात केली जाणार आहे. अ वर्ग श्रेणी आणि ब वर्ग श्रेणीत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनात ७५ पासून ते ५० टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार आहे.
कामगार संघटनांशी चर्चेनंतर हा निर्णय घेतला असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या वेतनातही ६० टक्के कपात होणार आहे.
मुख्यमंत्र्यांपासून सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ही कपात केली जाणार आहे.
कोरोनामुळे राज्यापुढे आर्थिक संकट उभं आहे. तर यापूर्वीचं राज्यावर साडेचार लाख कोटी रूपयांचं कर्ज आहे.