नशिराबाद ;- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५२ अाशा स्वयंसेविकांचा काेराेना याेद्धा म्हणून प्रजासत्ताकदिनी सन्मानपत्र देऊन गाैरव करण्यात अाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हाेते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री, प्रविण जगताप (आशा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक), दीपक देवगिरे (तालुका समूह संघटक), पी.डी. कोळी (आरोग्य सहाय्यक) सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक उपस्थित होते.








