जळगाव ;- आसोदा येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या वेळी तलाठी चंद्रकांत किनगे यांनी ध्वजारोहण केले. नियुक्त प्रशासक गणेश पाटील व ग्रामसेवक एम. टी. बगडे यांनी कार्यक्रमास दांडी मारली. माजी, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांनीही उपस्थित राहण्याचे टाळले. कार्यक्रमास पशुसंवर्धन अधिकारी राधिका इंगळे, ट्रेसर अनिल पाटील. माजी सरपंच विलास चौधरी, उपसरपंच अरूण कोळी, गोपाळ भोळे, किशोर चौधरी, दीपक चौधरी, शशिकांत पाटील, उमेश वाणी, कोतवाल भास्कर घुगे आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास दांडी मारणाऱ्या प्रशासक, ग्रामसेवकांसह शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती किशोर चौधरी यांनी दिली.








