प्रजासत्ताकदिनी दिनी आ.मंगेश चव्हाण व सौ.दिपाली चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम


चाळीसगाव प्रतिनिधी;- चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी व सीमा सुरक्षा दलातील शहिद जवान स्व.अमित साहेबराव पाटील हे महिनाभरापूर्वी कर्तव्यावर असतांना वीरगतीस प्राप्त झाले. त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा चि.भुपेश अमित पाटील याचे शैक्षणिक पालकत्व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री.मंगेश चव्हाण यांनी स्वीकारत असल्याचे वचन दिले होते त्यानुसार आज प्रजासत्ताक दिनी आ.मंगेश चव्हाण यांनी यावर्षीचा शैक्षणिक फी साठीचा धनादेश स्व.अमित पाटील यांच्या परिवारास सुपुर्द केला.
फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी शहिद जवान अमित पाटील यांच्या परीवारातील सदस्यांचा अपघात विमा उतरवला असून आज आमदार मंगेशदादा चव्हाण व सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते विमा पॉलिसी पेपर शहिद जवान अमित पाटील यांच्या वीरपत्नी,आई-वडील व भाऊ यांना देण्यात आले.
यावेळी शहिद जवान अमित पाटील यांच्या पत्नी श्रीमती रेखा अमित पाटील, वडील साहेबराव पाटील, आई सखुबाई पाटील,भाऊ योगेश पाटील यांच्या पाठीशी यापुढेही नेहमीच भक्कम उभे राहून प्रत्येक अडीअडचणीला साथ देऊ असे आश्वासन आ.मंगेश चव्हाण, नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी दिले. याप्रसंगी पं.स.माजी सभापती व विद्यमान गटनेते संजय भास्करराव पाटील,भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष नगरसेविका सौ.संगिताताई गवळी, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, राहुल पाटील, विकास गोसावी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







