जळगाव ;- रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर व स्माइल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत रिंगरोडवरील डॉ. शिरीष चौधरी यांच्या आस्था हॉस्पीटल येथे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
शिबिरात दुभंगलेले ओठ, टाळू, टाळूला शस्त्रक्रियेनंतर राहिलेले छिद्र, तिरपे राहीलेले नाक व्यवस्थित करणे, आवाज व्यवस्थित करण्यासाठी शस्त्रक्रिया व या संबंधित सर्व समस्यांविषयी मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरज असलेल्या सर्व रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी भूल देणे, औषधी, रक्त तपासणी पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांची राहण्याची व जेवणाची सुविधा निःशुल्क देण्यात येणार आहे. रुग्णांना येण्या-जाण्याचे भाडे देखील देण्यात येणार असल्याची माहिती रोटरी गोल्डसिटीचे प्रकल्प प्रमुख डॉ. दीपक अटल यांनी दिली. कोरोना विषयी सर्व शासकीय सूचना व नियमांचे पालन करुन शिबिराचे आयोजन केले असून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे सहकार्य व प्रांतपाल शब्बीर साकीर यांचे मार्गदर्शन आहे. शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी रिंगराेडवर डॉ. शिरीष चौधरी यांच्या आस्था प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी येथे करावी, असे विनायक बाल्दी, सुनील अडवाणी यांनी कळवले आहे.








