जळगाव प्रतिनिधी;- येथील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून तिघांनी दुचाकीवरून पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , कशिश सतीष नाथानी (वय-३८) रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी ह्या गृहीण आहेत.या नेहमीप्रमाणे १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्या मैत्रिणीसोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या होत्या. आकाशवाणी चौकातील ओट्यावर काही वेळ गप्पा मारत बसल्या. मोबाईलवर फेसबुक चेक करत असतांना तीन अनोळखी व्यक्तींनी जवळ येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. कशिश नाथानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.







