अमळनेर ;- पुणे पत्रकार भवनात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धुळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सारांश सोनार यांनी ‘ज्याचा त्याचा इतिहास ज्याचा त्याचा संदर्भ’ या विषयावर प्रभावी मांडणी करून पुणेकरांचे मन जिकले.
राज्यातून 80 मातब्बर स्पर्धक सहभागी झालेल्या या मानाच्या स्पर्धेत सारांश सोनार यांना आकर्षक चषक, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले!
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, प्राचार्य विजय बहिरम, प्राचार्या ज्योती राणे, प्रा. डॉ नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा संदीप नेरकर, उपप्राचार्य उल्हास मोरे, डीगंबर महाले, डॉ जी एम पाटील, योगेश मुंदडा, प्रा लीलाधर पाटील, प्रा पराग पाटील, श्याम सोनार, रवींद्र विसपुते, संजय सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, गणेश खरोटे, अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव तसेच सुवर्णकार समाजाने सारांश यांच्या या यशाबद्दल कौतुक केले!








