नाशिक ;- करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय, उत्तरप्रदेश व राज्यस्थानमधील कामगार मुलाबाळांसह रविवारी (दि.२९) पाच ट्रकमधून मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. ते ट्रक मुंबई-आग्रा महामार्गवरील नाशिक शहर सीमेवर आले असता पोलिसांनी रविवारी (दि.२९) रात्री नाकाबंदीदरम्यान गरवारे पॉईंट येथे अडवले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकमधील परप्रांतीय कामगारांना पोलिसांनी आश्रयस्थळी पाठविले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, करोना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जिल्हा व राज्य सीमा सील केल्या आहेत. मात्र, रोजगारानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीय मंजूर आपआपल्या भागात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईहून प्रवाशांना उत्तर भारतात घेवून जाणारे दोन ट्रक (एनआय ०1 एई 0418), (MP०९. जीजी ५977) रविवारी रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास गरवारे पॉईंट, उड्डाणपुलाजवळ आले असता पोलिसांनी अडवले. त्यात 67 जण प्रवास करीत असताना आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत ट्रक ताब्यात घेत प्रवाशांना अंबड गावातील सावित्रीबाई फुले मनपा प्राथमिक विद्यालयात, मनपा शाळा क्रमांक ७८ येथे आश्रयासाठी ठेवण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत, रविवारी मध्यरात्री ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास तीन ट्रक (जीजे 15, एटी २950), (एचआर 56, बी 6446), (एमएच 43, बीएफ 6928)मुंबईहून कामगारांना घेवून नाशिकच्या दिशेने उत्तर भारतात जात असताना गरवारे पॉईंट येथे पोलिसांनी अडवले. पोलिसांनी पाहणी केली असता ट्रकमध्ये कामगार अवैधरित्या जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी महापालिकेच्या करोना कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने सर्व प्रवाशांची तपासणी केली. ट्रकमधील २९१ प्रवाशांना सुखदेव आश्रम, विल्होळी आणि ३०० प्रवाशांना समाजकल्याण वस्तीगृह, नाशिक-पुणे रोड येथे स्थलांतरीत करण्यात आले.