भुसावळ :- शहरात दरोडा घालण्याचे इराद्याने लपलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी झडप घालून पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरात येणारे साहित्य आणि दोन जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे . शनिवारी मध्यरात्री झालेल्या या कारवाईत गोळीबारही या दरोडेखोरांनी केल्याचेही उघड झाले आहे . याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,

लोणारी मंगल कार्यालयासमोरून भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे हवालदार इकबाल अली इब्राहीम अली सैय्यद, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, समाधान पाटील, होमगार्ड मायकल, प्रसाद, चालक हवालदार चंद्रशेखर गाडगीळ हे पोलिस वाहन (एम.एच.19 एम.0632) ने यांच्यासह शनिवारी रात्री गस्तीवर जात असताना यातील एकाने आपल्या साथीदारांना आरोळी ठोकून पळण्यासाठी प्रवृत्त केले . पाळण्याच्या गडबडीत असणाऱ्या सर्वाना पोलिसांनी अटक केली .
यांना केली अटक
राकेश उर्फ डीडी राजू बारे (20) व भूषण उर्फ टक्या यशवंत मोरे (20, हुडको कॉलनी, भुसावळ) , विल्सन अलेक्झांडर जोसेफ (27), सागर आनंदा पारधे (30), ऑस्टीन शरद रामटेके (21, सर्व रा.हुडको कॉलनी, भुसावळ) यांना ताब्यात घेतले .
हि माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना दिल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.







