नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ; – कोरोना महामारीच्या साथीवर औषध तयार करण्यात आल्यानंतर आजपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या लसीकरणाचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी म्हटलं आहे. तसंच पहिल्या तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात ही संख्या ३० कोटींवर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मानस आहे, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिक आणि लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. “गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस बनवण्यात व्यस्त असलेले वैज्ञानिक, लस बनवणारे कर्मचारी कौतुकासाठी पात्र आहेत. सामान्यत: एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्या,” असं मोदी म्हणाले.
संकटाच्या त्याच वेळी, निराशेच्या त्याच वातावरणात, प्रत्येकजण आपले आयुष्य वाचवत होता. आमचे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका चालक, आशा कामगार, सफाई कामगार, पोलिस आणि इतरांनी चांगले सहकार्य केले, असंही मोदी म्हणाले.