जळगाव ;- भारताला लागलेल्या महाभयानक आजार कोरोना याचा फटका जळगाव जिल्हाला सुद्धा बसलेला आहे. संचार बंदीच्या काळात कलम 144 लागू असताना नागरिकांनी रेशन दुकानावर गर्दी करू नये व प्रशासनाच्या कायदेचे पालन व्हावे म्हणून सरकारी रेशन दुकान आणि लाभार्थी नागरिकांमध्ये सामाजिक संस्थेच्या १० स्वयंसेवकांना समन्वयक म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी जेणेकरून रेशन दुकानातील अत्यावश्यक वस्तू गहू,तांदूळ,डाळ,व रेशनधारकांची यादी सामाजिक संस्थाना देऊन त्या रेशनधारकांच्या घरापर्यंत पोचवू शकतो जेणेकरून रेशन दुकानांवर रेशन धारकांची गर्दी न होता थेट नागरिकांनपर्यंत सामाजिक संस्थेच्या मार्फत कार्डधारकांच्या घरपोच रेशन पोच होऊ शकते.प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यात एक दूवा म्हणून काम केल्यास विशिष्ठ अंतर राखण्याचा व गर्दी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जेणेकरून कोरोना सारख्या महाभयानक आजारापासून सुटका होऊन संसर्गजन्य रोग आटोक्यात येऊ शकतो म्हणून आम्ही धर्मरथ फाउंडेशन तर्फे आपणास कळकळीची विनंती करत आहे. की आमच्या संस्थेचे १० स्वयंसेवकांना परवानगी देऊन शासन मान्य रेशन दुकान आणि जनता यांच्यातला दुवा किंवा समन्वयक म्हणून सेवेची संधी देण्यात यावी ही अशी मागणी ‘धर्मरथ फाऊंडेशन’तर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली त्याप्रसंगी धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक विनायक पाटील,सागर कुटुंबळे, चंद्रशेखर कपडे,तुषार पटेल,यांची उपस्थिती होती..