• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु – उमा खापरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे, असं उमा खापरे यांनी सांगितले. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.

तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.

२००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत मदतीची साद घातली आहे.

धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे.

३ महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे याबाबतचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे. तसेच त्या व्हिडीओमधून किरीट यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडून जे आरोप होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


 

 

Previous Post

तर दिल्ली सरकार दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देईल – केजरीवाल

Next Post

पारोळा येथे राजे छत्रपती ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळा येथे राजे छत्रपती ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon