
पारोळा(प्रतिनिधी ) ;- शहरासाठी नवीन काहीतरी करण्यासाठी नेहमी नगराध्यक्षकरण पवार हे धडपड करीत असतात . आज पारोळा भुईकोट किल्ला धुळे येथील राजे छत्रपती ग्रुप तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले की नगरपालिकेच्या माध्यमातून किल्ला दत्तक योजनेतून घेऊन पर्यटन स्थळ कसे होईल याबाबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली व आपल्या शहराला लवकरच गतवैभव प्राप्त होईल . राजे छत्रपती ग्रुपने चांगला उपक्रम राबवित असून शहराच्या वतीने त्यांचे कौतुकास्पद कार्य असल्याचे ते म्हणाले .







