जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रीय युवा दिवसा निमित्त सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी विकास विभाग याच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. कर्यक्रमात सर्व प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी व उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत व इतर मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्राचार्य यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्वामी विवेकानंदानी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. महाविद्यालयाने अश्या महान व्यक्तीच्या कार्याचा उजाळा देण्यासाठी ऑनलाईन पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते यात विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विविध कार्य या विषयावर विद्यार्थ्यांनी घरी पोस्टर बनवून ऑनलाईन जमा केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, डॉ. एस. बी. पवार, डायरेक्टर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, डॉ. व्ही.एस. राणा, प्रा. के. श्रीवास्तव, प्रा. महेश रावलानी, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. रोहिदास सांगोरे विद्यार्थी विकास अधिकारी व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.








