मुंबई (वृत्तसंस्था ) : महाराष्ट्रातील मोठे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने कपात केल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. पण आता मनसेने राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र रक्षक पथक बनवलं आहे.

‘ज्या वरुण देसाई यांना धमकी काय तर कोणी गुदगुल्या ही करणार नाही. त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.’ अशी टीका त्याने शिवसेनेवर केली आहे. ‘आम्ही मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास समर्थ आहोत. २००८-०९ साली राज ठाकरेंना मारण्यासाठी युपी बिहार मधून एक तरुण बंदूक घेऊन आला होता हे ही सरकारने लक्षात ठेवावे.’ असं देखील मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.







