जळगाव प्रतिनिधी ;- शहरात सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात मनपा प्रशासनाला अपयश आले असल्याने आज मनपा आयुक्तांना भटक्या कुत्र्याची पिल्ले भेट देण्यात आल्याने मनपा वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली .
शहरात भटक्या कुत्र्यांचा दिवसेंदिवस हौदस वाढत चालला आहे. मागील दोन दिवसापासून मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडत आहे. मनपा प्रशासनाकडे वारंवार मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सभागृहात मांडूनही त्यांच्याकडून कोणताही तोडगा काढण्यात येत नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. आज स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी सदस्य शिवसेनेचे प्रशांत नाईक, भाजपचे नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण आदींनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना स्वतः सह आणलेले मोकाट कुत्र्याची दोन पिल्ले भेट देवून शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली.








