शिरसोली ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला
शिरसोली ता . जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली प्र . न. च्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणुकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना जिल्हा परिषद सदस्या श्रीमती धनुबाई आंबटकर यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला असून त्यांचे चिरंजीव संतोष आंबट्कर हे प्रभाग क्रमांक १,४ ६ मध्ये प्रचार करीत असून याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत विकासाला कौल देणारे उमेदवार उभे असल्याने गावाचा विकास होईल अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे. ग्राम पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून संतोष आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराचा जोरात प्रचार सुरु असून नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे . ठिकठिकाणी परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे . तसेच मतदार देखील प्रचार रॅलींमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवार विजयाचा कौल मागताना दिसत आहे . मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.








