चाळीसगाव — शहरातील नामवंत योगाचार्य तथा सेवाभावी प्रा. मधु कासार यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते आज त्यांचा शिवप्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे संजय वाघ सर , कपिल पाटील, बंडू पगार , प्रितेशभाऊ शर्मा सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा यांनी प्रा. कासार यांना शुभेच्छा देत आपल्या योगसाधनेतून शहराचे आरोग्य अधिक सदृढ राहील यासाठी जोमाने प्रयत्नशील रहावे अशी भावना व्यक्त केली.








